करमाळा प्रतिनिधी

तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. १७ वर्षे वयोगटात विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय असे तिन्ही क्रमांक पटकावले.

१७ वर्षे वयोगटात प्रतिक महेश झणझणे याने प्रथम क्रमांक, अथर्व ठाकसेनकुमार चव्हाण याने द्वितीय क्रमांक, तर ओम राजकुमार खाडे याने तृतीय क्रमांक मिळविला. तसेच सोहम प्रविण शिंदे याने पाचवा क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळविली.

तालुक्यातून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी केवळ पाच खेळाडूंची निवड करण्यात आली असून, या पाच खेळाडूंमध्ये कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

तसेच १४ वर्षे वयोगटातील मुलींच्या गटात श्रेया बिभीषण दुर्गुडे हिने पाचवा क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड निश्चित केली.

या सर्व यशस्वी खेळाडूंचे विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विद्यालयातील शिक्षक, पालक व क्रीडाप्रेमींमधून कौतुक होत आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *