करमाळा प्रतिनिधी

सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विशेष सहकार्याने आज करमाळा शहरासाठी भरघोस निधी प्राप्त झालेला आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत नगराध्यक्षा मोहिनी सावंत यांनी दिली आहे.

त्याबद्दल मी नगराध्यक्षा मोहिनी संजय सावंत, उपाध्यक्ष अतुल भैय्या फंड, सर्व नगरसेवक, करमाळा नगररिषदेचे मुख्याधिकारी व कर्मचारी तसेच करमाळा शहरवासियांच्या वतीने नगराध्यक्ष या नात्याने पालकमंत्री गोरे यांचे मनापासून आभार मानते. पालकमंत्री यांनी आपल्या शहराच्या विकास कामासाठी खालीलप्रमाणे निधी उपलब्ध करून दिलेला आहे. यामध्ये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान (जिल्हा स्तर) या योजने अंतर्गत पुढील प्रमाणे निधी दिला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वाधरूढ पुतळयाचा परिसर सुशोभिकरण करणे या कामासाठी रक्कम रू. 45,67,828/- (पंचेचाळीस लाख सदुसष्ट हजार आठशे अठ्ठावीस), संगम चौक ते महात्मा गांधी पुतळा रस्ता डांबरीकरण करणे या कामासाठी रक्कम रू. 1,49,31,988/- (एक कोटी एकोणपन्नास लाख एकतीस हजार नऊशे अठयाऐंशी), चांदगुडे गल्ली येथील अभिमान चांदगुडे घर ते राऊत घर रस्ता काँक्रीटीकरण करणे भाग ब या कामासाठी रक्कम रू. 8,90,311/- (आठ लाख नव्वद हजार तीनशे अकरा रूपये), चांदगुडे गल्ली येथील राऊत घर ते नेटके हॉस्पिटल रस्ता काँक्रीटीकरण करणे भाग अ या कामासाठी रक्कम रू. 7,38,989/ (सात लाख अडोतीस हजार नऊशे एकोणनव्वद रूपये), चांदगुडे गल्ली येथील राऊत घर ते नेटके हॉस्पिटल रस्ता काँक्रीटीकरण करणे भाग ब या कामासाठी रक्कम रू. 5,75,100/ (पाच लाख पंच्याहत्तर हजार शंभर रूपये), चांदगुडे गल्ली येथील मांगले घर ते पवार घर रस्ता काँक्रीटीकरण करणे या कामासाठी रक्कम रू. 9,99,562/-  (नऊ लाख नव्व्यांनव हजार पाचशे बासष्ट रूपये), चांदगुडे गल्ली येथील मांगले घर ते चांदगुडे घर रस्ता काँक्रीटीकरण करणे या कामासाठी रक्कम रू. 9,99,562/-  (नऊ लाख नव्व्यांनव हजार पाचशे बासष्ट रूपये), चांदगुडे गल्ली येथील चिंचकर घर ते समाज मंदीर ते माने घर ते निकम घर रस्ता काँक्रीटीकरण करणे या कामासाठी रक्कम रू. 9,99,562/-  (नऊ लाख नव्व्यांनव हजार पाचशे बासष्ट रूपये), चांदगुडे गल्ली येथील विविध परिसरात गटार बांधकाम करणे या कामासाठी रक्कम रू. 30,89,870/- (तीस लाख एकोणनव्वद हजार आठशे सत्तर रूपये), प्रभाग क्र. 1 मध्ये नगरपालिकेच्या मालकीच्या जागेमध्ये 10 सीट शौचालय बांधकाम करणे या कामासाठी रक्कम रू. 25,27,110/- (पंचवीस लाख सत्तावीस हजार एकशे दहा रूपये)

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजने अंतर्गत विविध विकास कामांकरिता पुढील प्रमाणे निधी प्राप्त झालेला आहे.

प्रभाग क्र. 10 मौलाली माळ भागामध्ये विविध ठिकाणी गटार बांधकाम करणे भाग अ या कामासाठी रक्कम रू. 43,83,059/- (त्रेचाळीस लाख त्रयाऐंशी हजार एकोणसाठ रूपये), प्रभाग क्र. 10 मौलाली माळ भागामध्ये विविध ठिकाणी गटार बांधकाम करणे भाग ब या कामासाठी रक्कम रू. 24,35,551/- (चोवीस लाख पस्तीस हजार पाचशे एक्कावन रूपये), प्रभाग क्र. 10 मौलाली माळ येथे स्त्रीयांसाठी व पुरूषांसाठी शौचालय बांधकाम करणे भाग अ या कामासाठी रक्कम रू. 26,89,139/- (सव्हीस लाख एकोणनव्वद हजार एकशे एकोणचाळीस रूपये), प्रभाग क्र. 10 मौलाली माळ येथे स्त्रीयांसाठी व पुरूषांसाठी शौचालय बांधकाम करणे भाग ब या कामासाठी रक्कम रू. 26,89,139/- (सव्वीस लाख एकोणनव्वद हजार एकशे एकोणचाळीस रूपये)

अशी एकूण रक्कम रू. 4,25,16,770/- (चार कोटी पंचवीस लाख सोळा हजार सातशे सत्तर रूपये) ऐवढा निधी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मंजूर केलेला आहे. तसेच नमो उदयान करिता रक्कम रू. 1 कोटीचा निधी मंजूर झाला असून कृष्णाजी नगर येथे सदरचे उद्यान उभा करणार आहोत त्याचप्रमाणे हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे लोककल्याण अभियान योजना अंतर्गत 50 लक्ष शिक्षणाकरिता व 50 लक्ष आरोग्या करिता निधी मंजूर झाला आहे.  व सदरचा निधी प्राप्त करण्यासाठी मी स्वत: नगराध्यक्ष मोहिनी संजय सावंत, उपनगराध्यक्ष अतुल भैय्या फंड, सर्व नगरसेवक व करमाळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन तपसे तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे विशेष प्रयत्न केले होते. यापुढेही शहराच्या सार्वांगीन विकासासाठी आम्ही सर्व कटीबध्द आहोत. यावेळी सावंत गटाचे व भाजपाचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *