करमाळा प्रतिनिधी

ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर, वाशिंबे येथे जाणारा मुख्य रस्ता सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीदरम्यान बंद होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र गावकऱ्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या प्रयत्नांमुळे अखेर हा रस्ता गावकऱ्यांच्या वहिवाटीसाठी खुला ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सदर रस्ता बंद झाल्यास ग्रामदैवताच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठा अडथळा निर्माण झाला असता. तसेच धार्मिक कार्यक्रम, यात्रा आणि इतर पारंपरिक सोहळ्यांवरही परिणाम झाला असता. ही बाब लक्षात घेऊन गणेश भाऊ चिवटे यांनी संबंधित प्रशासन व प्रकल्प व्यवस्थापनाशी सातत्याने संवाद साधला.

गावकऱ्यांच्या भावना आणि धार्मिक परंपरेचा मान राखत प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला. त्यामुळे आता सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू राहील, मात्र मंदिराकडे जाणारा मार्ग गावकऱ्यांसाठी कायम खुला राहणार आहे.

या निर्णयामुळे वाशिंबे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून गणेश भाऊ चिवटे यांच्या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *