करमाळा प्रतिनिधी

होळी हा सण हिरण्यकश्यपूवर नरसिंहाच्या रूपात विष्णूच्या विजयाचे स्मरण करतो. होळीच्या पूर्वसंध्येला, होलिकेच्या दहनाचे प्रतीक म्हणून शेकोटी पेटवली जाते. होळीच्या अग्नीत धान्य, नारळ आणि पुरणपोळीचा नैवेद्य टाकून तिला हार फुले वाहून होळीच्या भोवती प्रदक्षिणा घालून प्रार्थना करतात. होळीच्या दिवशी सर्व जण आपापसांतील मतभेद विसरून, एकत्र येऊन रंगांचा हा सण साजरा करतात.

स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल मध्ये होळी उत्साहात साजरी करण्यात आली आहे. स्नेहालय स्कूलच्या मुख्याध्यापिका धनश्री दळवी मँडम यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी होळीला गोल रिंगण करून पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा केला. रंगांची उधळण, गाणी, नृत्य आणि आनंदी वातावरणामुळे शाळा परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. 

या कार्यक्रमात शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी सक्रिय सहभाग घेतला. होळीच्या निमित्ताने एकतेचा, आनंदाचा आणि संस्कृतीचा संदेश देण्यात आला.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *