
करमाळा प्रतिनिधी
जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा परिषदेच्या सत्तेत राष्ट्रवादी भाजप महायुती म्हणून आम्ही एकत्रित कामकाज करणार आहे असे प्रतिपादन माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी केले. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ देवळालीचे सरपंच आशिष गायकवाड यांनी ठेवला होता. यावेळी आ. शिंदे बोलत होते.

पुढे बोलताना मा.आ. संजयमामा शिंदे म्हणाले की, जिल्हा परिषदेत तसेच पंचायत समितीच्या सत्तेत राष्ट्रवादी असणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनित्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचा कारभार सोलापूर जिल्ह्यात विकासात्मक केला जाणार आहे. जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर गेल्याने विकास खुंटला होता, कामे थांबली होती. आता निवडणुका झाल्या आणि आपली महायुतीची सत्ता आली आहे. जिल्ह्यात व तालुक्यात निधीची कमतरता भासू देणार नाही असे मा. आ. संजयमामा शिंदे यांनी सांगितले होते.

यावेळी भाजपचे जिल्हा परिषद सदस्य गणेश चिवटे, प्रशांत पाटील, वनमाला गुळवे, दळवे सर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा नुतन पंचायत समिती सदस्य भरत आवताडे, चंद्रकांत सरडे, अजित विघ्ने,पुजा ढेरे, नाना झाकणे,आदीजण उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अश्फाक जमादार, प्रवेश विद्यार्थी सरचिटणीस अजिंक्य पाटील, सुजित बागल, आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.