
करमाळा प्रतिनिधी
झरे, करमाळा तालुक्यातील झरे येथील जयप्रकाश बिले पब्लिक स्कूलच्या वतीने थोर संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त स्वच्छता मोहिमीचे आयोजन करण्यात आले. जयप्रकाश बिले पब्लिक स्कूल नेहमीच मुलांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करते. मुलांमध्ये सर्व मूल्यांची जोपासना व्हावी आणि आजचे विद्यार्थी भविष्यातील सुजाण नागरिक व्हावे याकडे कटाक्षाने शाळेचे लक्ष असते.

आज राष्ट्रसंत श्री गाडगे महाराज जयंती निमित्त वर्ग स्वच्छता हा उपक्रम शाळेत राबविण्यात आला. मुलांना स्वच्छतेचे महत्व प्रत्यक्षात आपला स्वतःचा वर्ग स्वच्छ करून मिळाला. आणि मुलांकडून यासाठी खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संस्थेचे सहशिक्षक सतिश कोंडलकर यांनी संत गाडगेबाबा यांच्या कार्याविषयीं विषयी माहिती सांगितली व स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. संचालिका डॉ. स्वाती बिले मॅडम यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष जयप्रकाश बिले सर, संचालिका डॉ. स्वाती बिले मॅडम, मुख्याध्यापिका अमृता परदेशी मॅडम, बी.सी. ए. कॉलेज चे हेड परदेशी सर, स्कूल समन्वयक सतिश कोंडलकर सर सर्व शिक्षक स्टाफ व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी वर्गखोल्या स्वच्छ केल्या व शैक्षणिक साहित्याची व्यवस्थित मांडणी केली. हे काम करताना विद्यार्थ्यांचा खुप मोठा उत्साह दिसून आला. अध्यक्ष जयप्रकाश बिले सर व संचालिका डॉ. स्वाती बिले मॅडम यांनी प्रत्यक्ष सर्व वर्गखोल्यांची पहाणी केली. त्यांनी विद्यार्थ्याचे कौतुक केले व अनमोल असे मार्गदर्शन केले.
