
करमाळा प्रतिनिधी
शेतीमध्ये प्रगती साधण्यासाठी अडचणीवर मात करून यशस्वी झालेल्या अनुभवी शेतकऱ्यांचे अनुकरण इतर शेतकऱ्यांनी करण्याची गरज असल्याची प्रतिपादन उपविभागीय कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी शेटफळ तालुका करमाळा येथे लोकविकास कृषी गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रम व यानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा उपस्थित होत्या. पुढे बोलताना ते म्हणाले की, शेती तोट्यात आहे असे बोलले जाते मात्र अनेक शेतकऱ्यांनी ती फायद्यात करून दाखवलेली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि योग्य मार्गदर्शन मिळाले तर शेती फायदेशीर होते. यासाठी शेती क्षेत्रामध्ये यशस्वी झालेल्या शेतकऱ्यांचे

अनुकरण इतर शेतकऱ्यांनी करण्याची गरज आहे. येथील नागराज मशिनरी शेती मॉल व लोकविकास फार्मर्स प्रोडूसर कंपनीच्या वतीने या शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सुषमा व संतोष संभाजी चव्हाण, अश्विनी व श्रीकृष्ण ज्ञानदेव गोडगे, जयश्री व मल्हारी किसन दुरंदे, अर्चना व रविंद्र दत्तात्रय देवकर, नगीना व ब्रम्हदेव चंद्रकांत पोळ, मनिषा व संतोष चंद्रहार कदम, छाया व रामदास काशिनाथ बिचितकर, मनिषा व भारत मुरलीधर आडसुळ, रूपाली व राहूल तात्याराम मोरे, उज्ज्वला व बापूराव औदुंबर रोकडे या शेतकऱ्यांचा व मंडल कृषी अधिकारी मधुकर दत्तू मारकड यांचा लोकविकास कृषी गौरव पुरस्कार देऊन संपात करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकविकास

शेतकरी उत्पादक कंपनीचे गजेंद्र पोळ यांनी केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांनी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे गणेश करे पाटील यांनी गट शेतीच्या माध्यमातून सुरू असलेले लोकविकास शेतकरी उत्पादक कंपनीचे काम तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. यावेळी के डी एक्सपोर्टचे किरण डोके, जे निरीगेशनचे किरण पाटील, पंचायत समिती सदस्य सोनाली तकिक यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक नंदकिशोर वलटे यांनी केले तर आभार जानवी पोळ यांनी मानले. आदिनाथचे उपाध्यक्ष महेंद्र पाटील, लोकविकास शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष वैभव पोळ, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र कुमार बारकुंड, मंडल कृषी अधिकारी मधुकर मारकड, अमर अडसूळ, सुप्रिया शेलार, कैलास लबडे, किरण पोळ, मुरलीधर पोळ, नानासाहेब साळुंके, प्रशांत नाईकनवरे, विष्णू पोळ,सुहास पोळ, अतुल गोडगे, भाऊसाहेब सरडे, दिगंबर साळूंके, नंदकिशोर वलटे श्रीकांत साखरे, निलेश दुरंदे, अंगद पाटील यांच्यासह करमाळा तालुक्याच्या विविध गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.