करमाळा प्रतिनिधी

करमाळा शहराची हद्दवाढ करून शहरालगत विकसित झालेल्या चारही दिशांच्या बाजुचा भविष्यातील वाढणा-या लोकसंख्येचा विचार करुन करमाळा ग्रामीण भागाचा करमाळा नगरपरिषदेच्या हद्दीत समावेश करावा, करमाळा शहराच्या पूर्व भाग हा देवीचामाळ आणि संगोबा आणि पांडे रोडकडील लोकवस्ती असलेला भाग तसेच, दक्षिणेकडील गुरसळी रोड, आणि देवळाली रोड कडील बागल पेट्रोलपंपापर्यंत आणि पश्चिम कडे रोशेवाडी गाव वेशीपर्यंत व उत्तरेकडील नालबंद नगर भागातील आणि कानाड वस्ती लगत असणा-या भागात, एम आय डी सी पर्यंतच्या हद्दवाढ भागाचा समावेश करुन टाऊन प्लॅनिंग करण्यात यावे. तसेच तेथील राहणारे भागात स्ट्रीट लाईटची व्यवस्था करावी, ड्रेनिजची व्यवस्था, पाणीपुरवठा याची सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फाऊंडेशन करमाळा व सकल मुस्लीम समाज करमाळा यांच्या वतीने नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, विरोधी पक्षनेते, सर्व पक्षाचे गटनेते व मुख्याधिकारी, प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, करमाळा शहरालगतच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर प्लॉटिंग होऊन सुमारे दोन किलोमीटर परिसरात करमाळा शहराच्या चारही दिशांनी नागरी वस्ती निर्माण झाली आहे. अनेक घरे व बंगले उभारले गेले असले तरी हा भाग शहर हद्दीबाहेर असल्याने नागरिकांना गटारी, पाणीपुरवठा, रस्ते, वीज आदी मूलभूत नागरी सुविधा नियमितपणे उपलब्ध होत नाहीत. परिणामी रहिवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सदर ग्रामीण भागाचा शहर हद्दीत समावेश केल्यास नागरिकांना आवश्यक नागरी सुविधा पुरविणे शक्य होईल. तसेच नगरपरिषदेच्या कररचनेतून महसुलात वाढ होऊन शहराच्या विकासालाही चालना मिळेल असे निवेदनात म्हटले आहे. या संदर्भात नगरपरिषदेकडून ठराव मंजूर करून शासनस्तरावर प्रस्ताव पाठविण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

करमाळ्याचे आराध्य दैवत श्री कमलाभवानी मंदिर परिसराची सैराट सारख्या लोकप्रिय चित्रपटामळे संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक झाले आहे त्यामुळे करमाळा भागात पर्यटन करणारे लोकांची संख्याही वाढलेली आहे. या सर्व बाबींचा विचार करून करमाळा नगरपरिषदेच्या सर्व नगरसेवक व प्रशासन यांनी विचार करावा अशी मागणी करमाळा नगरीतील नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे त्यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फाऊंडेशन करमाळा व सकल मुस्लीम समाज करमाळा यांनी केली आहे.

यावेळी सकल मुस्लीम समाज चे मार्गदर्शक समीर शेख, डॉ. सकल, मुस्लीम समाज चे अध्यक्ष जमीर सय्यद, रोहित पवार फाउंडेशन चे तालुकाध्यक्ष मुस्तकीम पठाण,  सचिव रमजान बेग, रहनुमा ट्रस्ट चे सचिव सुरज शेख, नगरसेवक हुमरान मुलाणी, फिरोज बेग,  कलंदर शेख, अॅड. अलिम पठाण, अॅड. नईम काझी, जहाँगीर बेग, इकबाल शेख, इम्तियाज पठाण, जावेद सय्यद, अरबाज बेग शाहीद बेग, अलिम पठाण, सुपरान शेख, खलील कुरेशी, आरीफ पठाण, गुलाम सय्यद,कय्युम मदारी, अक्रम मदारी,दाऊद मदारी, आदीजण उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *