
करमाळा प्रतिनिधी
वसंतराव नाईक महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रताप पवार हे सध्या जिल्हा व्यवस्थापक असून त्यांच्याकडे वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे. परंतु ते या पदास पात्र नाहीत व त्या पदावर राहून त्यांनी कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला असे गणेश भानवसे यांनी वारंवार संबंधित मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री यांना तक्रार केली होती.

काही दिवसापूर्वी त्यांनी आझाद मैदान येथे पाच दिवसाचे आमरण उपोषण केले होते. परंतु त्यानंतर त्यांना लेखी आश्वासन देऊन उपोषणापासून परावृत्त केले होते. परंतु त्यावर कसल्याही प्रकारची कारवाई झाली नाही.
त्यामुळे गणेश भानवसे हे दिनांक 10 डिसेंबर 2025 पासून संविधान चौक नागपूर या ठिकाणी उपोषण करणार होते.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाचे मंत्री अतुलजी सावे यांनी गणेश भानवसे यांच्याशी संपर्क साधून चर्चेला बोलावले. चर्चेदरम्यान त्यांनी संबंधित विभागाचे सचिव यांना प्रताप पवार यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यामुळे गणेश भानवसे यांचे संविधान चौक नागपूर येथील उपोषण त्यांनी तूर्तास स्थगित केले आहे.