करमाळा प्रतिनिधी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सरपडोहच्या खो-खो संघाने तालुकास्तरीय स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवून शाळेचा आणि गावाचा मान उंचावला आहे. या अभूतपूर्व यशानिमित्त ग्रामस्थांच्या वतीने सर्व खेळाडू व मुख्याध्यापक श्रीकृष्ण अडसुळ, लोकरे सर, बडे मॅडम, वणवे मॅडम, कुलकर्णी मॅडम मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत द्वितीय क्रमांक आल्या बद्दल साक्षी खराडे हीचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास उपसरपंच नाथाराव रंदवे सर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब महाडीक, प्रगतशील बागायतदार शरद घोगरे, माजी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य मनोहर रंदवे, तंटा मुक्त समिती अध्यक्ष नागनाथ भिताडे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी लोकरे सर यांनी देखणेपणे केले, तर आभार प्रदर्शन बडे मॅडम यांनी केले.

खेळाडू, प्रशिक्षक शिक्षक व शाळेचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

विद्यार्थी साईराज महाडीक, विशंभु पवार, प्रिन्स गवारे, अक्षय येळे, प्रणव खराडे, सिद्धार्थ येळे, संग्राम येळे, समाधान मारकड, अथर्व पाटील, पृथ्वीराज भिताडे, तन्मय घोगरे, ओंकार काळे, शिवतेज भिताडे यांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *