करमाळा प्रतिनिधी

श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना शिवसेना आयोजित करमाळा तालुका कार्यकारिणीची बैठक व पदाधिकाऱ्यांच्या निवडी दिनांक 3 नोव्हेंबर मंगळवार रोजी सायंकाळी 7 वाजता जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांच्या संपर्क कार्यालय करमाळा येथे संपन्न झाली. यावेळी तालुका अध्यक्ष पदी दादासाहेब तनपुरे, तालुका उपाध्यक्ष पदी राहुल शिंदे, मिलिंद भोसले, संघटक पदी राजेंद्र कांबळे, महिला तालुका अध्यक्ष पदी रेखा ताई मुळूक, सचिव पदी सतीश कोल्हे, मिडिया प्रमुख पदी सूर्यकांत होनप, कोषाध्यक्ष पदी भाऊसाहेब भोसले व सदस्य पदी मजनू शेख, संतोष गोरे, नामदेव पालवे यांची निवड जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना आयोजित करमाळा तालुका पदाधिकाऱ्यांच्या निवडीच्या कार्यक्रमाला ओबीसी व्हिजेएनटी सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुयेश करचे, ओबीसी व्हिजेएनटी महिला जिल्हा अध्यक्ष पद्मजा इंगोले, युवासेना तालुका उपाध्यक्ष नवनाथ गुंड तसेच पत्रकार बांधवांसह सर्व शिवसैनिक उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *