
करमाळा प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यातील शेतकर्यांनी रिटेवाडी उपसा सिंचन योजना झाली पाहिजे अशी मागणी लावून धरली आहे. यामध्ये रस्ता रोको पासून अनेक आंदोलन झाली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे मा.तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे-पाटील यांनी देखील वरिष्ठ पातळीवर गाठी भेटी घेऊन हि योजना तालुक्यातील शेतकर्यांना कशी लाभदायक आहे

व आत्तापर्यंत शेतकर्यां वरती कसा अन्याय झाला आहे घागर उशाला कोरड घशाला अशी अवस्था आमची झाल्याची माहिती वरिष्ठ नेते पालकमंत्री जयकुमार गोरे यांना सांगितली. आपल्या तालुक्यात माण-खटाव मध्ये पृथ्वीच्या अंत पर्यंत पाणी

येणार नाही असे नेते बोलत होते परंतु आपण त्या ठिकाणी पाणी आणले धरण केले त्यामुळे आमच्या शेतकर्यांना न्याय देखील आपणच देऊ शकता. आमची योजना मार्गी लावू शकता. ही आशा आत्मविश्वास आम्हाला आहे. आपण लक्ष घालण्याची मागणी मांढरे-पाटील यांनी केली व लगेच गोरे यांनी मंगळवार दि. ११/११/२०२५ रोजी संबंधित विभागाच्या मंत्री महोदय यांच्या बैठकीचे नियोजन केले आहे. यामध्ये तालुक्यातील राजकीय नेत्यांनी श्रेयवादाचे राजकारण न करता योजना कशी मार्गी लागेल याकडे लक्ष देण्याचे आव्हान हनुमंत मांढरे-पाटील यांनी केले आहे.