
करमाळा प्रतिनिधी
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे साखर विक्रीतील एम एस सी बँकेकडे असलेले कामगारांचे हक्काचे तीन कोटी 32 लाख रुपये कामगारांना मिळवून दिल्याबद्दल श्री आदिनाथ कारखान्याचे संचालक ॲड. राहुल सावंत व डॉ. हरिदास केवारे यांचा आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
चेअरमन व आमदार नारायण आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक डॉ. हरिदास केवारे व ॲड. राहुल सावंत यांच्या प्रयत्नातून कामगारांना ३ कोटी ३२ लाख ८२ हजार ११९ रुपये व त्यावरील व्याज मिळून दिल्याबद्दल कामगारांनी संचालक ॲड. राहुल सावंत व डॉ. हरिदास केवारे यांचा सत्कार केला. यावेळी श्री आदिनाथ महाराज मंदिर येथे भंडारा ठेवण्यात आला होता.

आ. रणजितसिंह (दादा) मोहिते पाटील, खा. धैर्यशील (भैय्या) मोहिते पाटील, कारखान्यांचे चेअरमन व आमदार नारायण (आबा) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक डॉ. हरिदास केवारे व ॲड. राहुल सावंत यांच्या प्रयत्नातून यश आले. सहा वर्षांपासून बॅकेत पेडींग असलेली रक्कम कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे.
श्री आदिनाथ कारखान्याने MSC बँकेकडे साखर विक्रीचे असलेल्या रक्कम रु. ३ कोटी ३२ लाख ८२ हजार ११९ रूपये (अधिक त्या वरील व्याज) पैकी पहिल्या टप्प्यात रक्कम रूपये २५१४७८०९ (अधिक त्या वरील व्याज) इतकी रक्कम श्री आदिनाथ सह. साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांमध्ये अदा करावेत (देण्यात यावेत) या करिता अर्ज केलेला होता. सोलापूर येथील मे.कोर्ट कुंभार यांच्याकडे कारखान्याने दाखल केलेला अर्ज मंजूर केलेला आहे आणि रक्कम रु. ३ कोटी ३२ लाख ८२ हजार ११९ रूपये (अधिक त्या वरील व्याज) पैकी पहिल्या टप्प्यात रक्कम रूपये २५१४७८०९ (अधिक त्या वरील व्याज) इतकी रक्कम कारखान्याच्या कर्मचाऱ्यांमध्ये देण्याबाबत मे.कोर्टाने आदेश केलेला आहे अशी माहिती संचालक ॲड. राहुल सावंत यांनी दिली आहे.
त्या वेळेसच्या आपसातील मतभेदांमुळे ही रक्कम बँकेत सहा वर्षांपासून पेडींग राहिली.
जवळपास तीन महिन्यांपासून ॲड.राहुल सावंत व डॉ. हरिदास केवारे यांनी चेअरमन व संचालक मंडळ, कर्मचाऱ्यांना आणि प्रशासकीय अधिकारी विश्वासात घेऊन सोलापूर येथे मे. कोर्टात स्वतः हजर राहून प्रयत्न करत होते. त्या अनुषंगाने कायम कर्मचारी व हंगामी कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांची यादी विभागानुसार प्रत्येक कर्मचाऱ्यांचे नाव, प्रत्येकाचे बँक खाते नंबर व आयएफसी कोड सहित कारखान्यांनी ही यादी कोर्टात दाखल केली आणि त्या प्रमाणे मे कोर्टाने रक्कम कर्मचाऱ्यांना अदा करण्यात यावे असा आदेश दिला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात दि. ३०/१०/२०२५ रोजी ही रक्कम कामगाराच्या बँक खात्यात जमा झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात काही कामगार यांची रक्कम त्यांच्या बॅक खाते नंबर वर जमा होईल तसेच उर्वरित ज्या कामगारांना रक्कम मिळाली नाही त्या कामगारांनी लवकरात लवकर मे कोर्टात अर्ज दाखल करावा म्हणजे त्यांची रक्कम बँकेत खाते नंबर वर जमा करता येईल. काही अडचण आली तर माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन संचालक ॲड राहुल सावंत यांनी केले.
यावेळी कार्यकारी संचालक अरूण बागनवर, ओ एस मधुकर कदम, चिफ इंजिनिअर जाधव, चिफ केमिस्ट कुलकर्णी, डिप्युटी चिफ इंजिनिअर दिपक देशमुख, डिप्युटी चिफ केमिस्ट मोहीते, आर एम जाधव आणि कामगार ऊत्तरेश्वर चव्हाण, बाळासाहेब महाडीक, बाबा शिंदे, महेश मोरे, कुंडलिक शिंदे, राहुल झिंजाडे, दादासाहेब रासकर, बाबासाहेब केकान, काकासाहेब भानवसे, दिलिप झिंजाडे, वजीर भई, वनराज बाळशंकर, हनुमंत पाटुळे, युवराज टकले, देविदास कुंभार, बाबा तोरणे, गणेश कराड, बाळासाहेब थोरात, विकास नरसाळे, सुग्रीव नलवडे, विजय जगदाळे, विक्रम पाटील, शामराव लोंढे, गणेश सरक, रवी दळवी, तसेच कामगार उपस्थित होते.