
करमाळा प्रतिनिधी
मागील दहा ते पंधरा दिवसापासून सीना नदीला आलेल्या महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील चार तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्यापैकी माढा तालुक्यात सर्वात जास्त 21 गावात नुकसान झाले. राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पूरकाळात तीन दिवस पूर्णवेळ माढा तालुक्यात थांबून परिस्थिती नियंत्रणात आणली, त्यासाठी तहसीलदार संजय भोसले व गट विकास अधिकारी महेश सुळे यांनी शर्तीचे प्रयत्न केले. त्याचबरोबर एन डी आर एफ, आर्मी व काही ठिकाणी हेलिकॉप्टरच्या साह्याने रेस्क्यू देखील करण्यात आले. पालकमंत्री यांनी पूर्णवेळ तालुक्यात थांबल्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणांना गती आली त्यामुळे कोणत्याही प्रकारची मनुष्यहानी झाली नाही. मागील आठ दिवसापासून नागरिकांना वाचवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत होतो. त्याचबरोबर आता जनावरांना चारा असेल, बाधित कुटुंबातील सदस्यांना जेवण असेल या गोष्टी ची मदत सर्वांपर्यंत पोहचत आहे.

सीना नदीला आलेल्या महापुरात ज्या घरांची पडझड झाली त्याचबरोबर बाधित झाली अशा कुटुंबांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून रमाई घरकुल योजना तसेच प्रधानमंत्री आवास योजना या योजनेच्या माध्यमातून तातडीने घरकुल मंजूर करून देणार.
महापुरात वाहून गेलेले रस्ते व पूल तातडीने दुरुस्त करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून मंजूर करून घेणार.
महापुरात बाधित झालेल्या घरांना तातडीची मदत म्हणून दहा हजार रुपये देण्यासाठी तहसीलदार यांना सूचना केल्या त्याप्रमाणे प्रत्येक बाधित कुटुंबप्रमुखाच्या नावावर रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
पुरात वाहून गेल्यामुळे मृत्युमुखी पडलेले घाटणे गावचे संतोष मारुती गाडे यांना चार लाख रुपयांची मदत मंजूर करून दोन दिवसात संबंधित मृत व्यक्तीच्या नातेवाईकांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांनी दिले आहेत.
त्याचबरोबर माढा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या सर्व मंडळातील पिकांचे व फळबागांचे पंचनामे सुरू आहेत. त्यात द्राक्ष बागांचा समावेश करण्याच्या सूचना तहसीलदार संजय भोसले यांना दिल्या.
या पत्रकार परिषदेस राज्य परिषद सदस्य दत्तात्रय जाधव, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रशांतराजे पाटील, माढा शहराध्यक्ष मदन मुंगळे, अमरराजे महाडिक, ओबीसी मोर्चा अध्यक्ष नितीन शिंगाडे, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा अर्चना सावंत, ओबीसी मोर्चा सरचिटणीस शहाजी माळी, तालुका उपाध्यक्ष पांडुरंग राऊत, एससी मोर्चाचे तालुकाध्यक्ष नवनाथ जाधव, किसान मोर्चाचे सरचिटणीस विवेक कुंभेजकर, विधी आघाडी सरचिटणीस एडवोकेट गणेश देशमुख, आबा पवार, लखन पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.