
करमाळा प्रतिनिधी
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर यांच्या आदेशानुसार विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय वरिष्ठ विभाग राष्ट्रीय सेवा योजना (NSS) च्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी निधी गोळा करण्यात आला. याचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.बी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

प्राध्यापकांची एक दिवसीय पगार पूरग्रस्तांसाठी कट करत असतानाही काही प्राध्यापकांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून मदत केली आहे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ही यासाठी मदत केली.
याचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमअधिकारी प्रा. सुधीर मुळीक, प्रा. दीपक सोनवणे, प्रा. धीरज पाचपिले, स्वयंसेवक कृष्णा शेलार, कृष्णा पवार, शुभम देशमाने, विजय वाघमोडे, जय गांधी, सोफिया पठाण, संजना मारडकर यांनी केले.