
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरातून बायपास रोड जाणार आहे त्या ठिकाणी भिंत ऐवजी पिलर उभा करावे अशी मागणी मंत्री योगेश कदम यांच्याकडे शिवसेना ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष अंकुश जाधव यांनी केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील सभागृहात यावेळी आमदार नारायण पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे, वैभवराजे जगताप, शंभूराजे जगताप आदिजण उपस्थित होते.

जाधव म्हणाले की, भिंत उभा केल्यास करमाळा शहराचे दोन भाग होतील. पिलर उभा केल्यास या लोकांना तिकडे जाता येईल, त्या लोकांना इकडे येता येईल, व्यापार करता येईल. त्यामुळे भिंत नको अशी मागणी अध्यक्ष अंकुश जाधव यांनी केली आहे. यासंदर्भात शिवसेना जिल्हा अध्यक्ष महेश चिवटे यांनीही मंत्री योगेश कदम यांच्याकडे मागणी केली आहे.