करमाळा प्रतिनिधी
मराठा समाजाच्या महिलांबद्दल अतिशय गलिच्छ भाषा वापरणाऱ्या पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले याला मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे पाटील यांनी कायमचे घरी पाठवले आहे. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुखमंत्री एकनाथ शिंदे यांची महेश डोंगरे पाटील यांनी भेट घेऊन दि.१२/१०/२०२२ रोजी निवेदन दिले होते, तात्काळ महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना निलंबनाचे आदेश केले होते. त्या निवेदन मध्ये महेश डोंगरे पाटील यांनी मराठा समाजाच्या महिलांबद्दल अत्यंत अश्लील लज्जास्पद अपमान पद वक्तव्य करणाऱ्या पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना बडतर्फ करा, अशी मागणी महेश डोंगरे पाटील यांनी केली होती. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ सूचना दिल्या व अखेर या मागणीला यश मिळाले व वाचाळवीर पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना बडतर्फ केले. कुठलाही अधिकारी मराठा व महिलेबाबत अश्लील भाषा व अपमान करेल त्याला आम्ही सोडणार नाही असे मनोगत महेश भैय्या डोंगरे पाटील यांनी व्यक्त केले.
मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह विधान करून समाजाची भावना दुखावणाऱ्या पोलिस निरिक्षक किरणकुमार बकाले यांना अखेर सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी या संदर्भात आदेश काढले.
जळगाव पोलिस दलातील तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बकाले यांनी आपल्या सोशल मीडियावर मराठा समाज व छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मराठा समाजातील संघटनांनी संताप व्यक्त करत आंदोलन उभारले. वाढत्या दबावामुळे पोलिस प्रशासनाने त्यांना निलंबित केले होते. मात्र, तपासानंतर त्यांच्या विधानांमुळे समाजात तणाव निर्माण झाला असल्याचे सिद्ध झाल्याने त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले.
याप्रकरणी मराठा समाजातील जळगाव येथील अशोक राजे शिंदे यांनी जोरदार आंदोलन छेडले होते. पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाल्याने अखेर शासनाने बकाले यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. व ऑर्डर करून बडतर्फ केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे मराठा समाज व महेश डोंगरे पाटील यांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानले.
दरम्यान, बकाले सहा दिवस कारागृहातही होते. त्यांच्या विधानामुळे संताप वाढल्याने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची परिस्थिती निर्माण झाली होती.