
करमाळा प्रतिनिधी
तरटगाव बंधारा फुटून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्वरित शासनाने दखल घेऊन उपाययोजना कराव्यात अशी मागणी उपसरपंच अभिजीत प्रदिप कुमार जाधव पाटील यांनी केली आहे.
तरटगाव तालुका करमाळा आणि बिटरगाव आळजापुर गावांना जोडला जाणारा तरटगाव, कोल्हापूर पद्धतीचा बंधाऱ्याचा भराव बिटरगाव साइडने पुर्णपणे वाहून गेलेला आहे. तरी तरटगाव बंधाऱ्याची दारे टाकता येणारं नाहीत, दारे टाकली तरी बंधारा मध्ये पाणी राहणार नाही पाणी बिटरगाव साइड ने निघून जाणार आहे. शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाण्याची खूप मोठी समस्या निर्माण होऊ शकते. तरी लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी उपसरपंच अभिजीत प्रदीपकुमार जाधव पाटील यांनी केले आहे.
