
करमाळा प्रतिनिधी
शेतकरी शेतमजूर बांधव, दिव्यांग बांधव, वंचित निराधार, महिला, मेंढपाळ, मच्छिमार, बेरोजगार तरुण, विटभट्टी संघटित असंघटित कामगार, कुंभारकाम, चांभारकाम, सुतारकाम, लोहारकाम करणारे छोटे मोठे व्यवसायीक, दुधउत्पादक शेतकरी, फळ उत्पादक, ऊस कापूस सोयाबिन उत्पादक शेतकरी यांच्या न्याय व हक्काच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा कोरा कोरा करु असे म्हणणाऱ्या व शेतकयांच्या मालाला हमीभाव मिळावा या मागणीसाठी सरकारने दिलेला शब्द पूर्ण करावा. या गेंड्याच्या कातडी ढोंगी सरकारला जागं करण्यासाठी आज महाराष्ट्रात अराजकत पोलीस प्रशासन मनमानी गृहखाते

मुख्यमंत्री यांचे सर्व दुर्लक्ष करीत सामान्य माणसाला हेळसांड होत आहे. प्रशासन अधिकारी मग्रूर मी पण सरकारचा धाक उरलेला नाही. हवे तिथ लक्ष हव, नाही तिथेच सरकार करतय सरकारच्या विरोधात मोठा जण आक्रोश उभा करून भाजपा सरकार हटाव संविधान बचाव करण्यासाठी सर्वानी एकत्र मिळून आवाज करणे आवश्यक आहे. असे मत युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साहेबराव वाघमारे यांनी केले. प्रहार शेतकरी संघटना यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी प्रहार शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष बच्चू भाऊ कडू, तालुकाध्यक्ष संदीप तळेकर, काँग्रेस कार्यकर्ते प्रतीक जगताप, अण्णा साळवे, केम व तालुक्यातील अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.