करमाळा प्रतिनिधी

मकाई कारखान्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी 140 कोटी रुपये मंजूर केलेले असताना या रक्कमेची कशी विल्हेवाट लावली याचा तपशील सभासदाला देणे गरजेचे असताना   कारखान्याच्या प्रमुख भाजपच्या रश्मी बागल यांनी सभासदांना अंधारात ठेवून सोमवारी घटस्थापने दिवशी जाणीवपूर्वक सकाळी दहा वाजता सर्वसाधारण सभा बोलावली असून ही बैठक रद्द करावी. पुढील पंधरा दिवसाची तारीख द्यावी अशी मागणी कारखान्याचे माजी चेअरमन आप्पासाहेब झांजुर्णे व माजी संचालक महेश चिवटे यांनी केली आहे.

याबाबत आप्पासाहेब झांजुर्णे म्हणाले की, नियमानुसार पंधरा दिवस आदी सभासदांना वार्षिक खर्चाचा अहवाल देणे गरजेचे आहे तसेच चालू आर्थिक वर्षात १४० कोटी रुपये एनसीडसी बँकेने दिली असून त्याची विल्हेवाट कशी लावली. कर्मचाऱ्यांच्या पगारी साठी दहा कोटी रुपये दिले असताना कर्मचाऱ्यांना केवळ दोन पगारी दिली आहेत. मिळालेल्या कर्जातून स्वतःचे वैयक्तिक नावावर कर्ज फेडून विद्यमान संचालक मंडळाला अडचणीत आणण्याचे काम चालू आहे.

रश्मी बागल यांच्या भ्रष्टाचारी कारभारामुळे मकाई कारखान्याचे सभासद, कर्मचारी, ऊस वाहतूक, तोडणी कामगार यांचे प्रपंच उध्वस्त झाले आहेत. याचा जाब विचारण्यासाठी शेतकरी येतील या भीतीने जाणीवपूर्वक घटस्थापने दिवशी सकाळी दहा वाजता बैठकीच्या आयोजन केले आहे. कुणी सभासद या बैठकीला येऊ नये, या बैठकीत विस्तारीकरण असेल, आदी ठराव बेकायदेशीरपणे मंजूर करून घेणे असा डाव रश्मी बागलचा आहे.

अजून एकही सभासदाला अहवाल मिळालेला नाही यामुळे ही बैठक रद्द करावी अशी मागणी झांजुर्णे व चिवटे यांनी साखर आयुक्त सिद्धेश्वर सालीमठ यांच्याकडे केली असून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडेही तक्रार केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी 140 कोटी रुपये मकाई कारखान्याला मंजूर केले. मात्र या पैशाचा गैरव्यवहार करून रश्मी बागल यांनी पुन्हा कारखाना दिवाळखोरीत घालण्याचे पाप केले असून यावर्षीही कारखाना गाळपास सज्ज नाही मग पैसे गेले कुठे असा प्रश्न यांनी उपस्थित केला आहे. कारखान्याच्या विस्तारीकरणाच्या नावाखाली अजून नवीन 150 कोटी रुपये कारखान्यावर कर्ज काढून रश्मी बागल करमाळा तालुका सोडून जाण्याची भीती आहे असाही दावा झांजुर्णे यांनी केला आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *