करमाळा प्रतिनिधी

पोलादी पुरुष कणखर नेतृत्व देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या 75 व्या अभिष्टचिंतन सोहळ्या जन्मदिनानिमित्त राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान संचलित श्री संत ज्ञानेश्वर माऊली गोशाळा खांबेवाडी यांच्यावतीने गो पूजन व गो ग्रास वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न झाला आहे.

करमाळा तालुक्यामध्ये अतिवृष्टी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन लोकांना मदत करण्याचे काम करत असल्यामुळे कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण आबा पाटील हे सुद्धा शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी बांधावरती जाऊन शेतकऱ्यांना अन्नदान निवाऱ्याची सोय करत आहेत त्यामुळे तेही कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. आमदार नारायण आबा पाटील गटाचे पांडे गावचे सरपंच आदिनाथ भैय्या शिंदे पाटील यांच्या हस्ते गोपूजन व गोग्रास कार्यक्रम संपन्न झाला. प्रमुख उपस्थिती भाजप सोलापूर जिल्हा चिटणीस विनोद महानवर, खांबेवाडी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ शिंदे, निलज ग्रामपंचायतचे सदस्य विनोद गरड, उद्योगपती श्रीराम भाऊ शिंदे, महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान विश्वजीत नरोटे, ह.भ.प. रामभाऊ वाघमोडे, भगवान वाघमोडे, क्षिरसागर, अक्षय लांडगे, भारत लांडगे आदि जन पदाधिकारी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. अण्णासाहेब सुपनवर यांनी प्रस्ताविक केले. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी हे गोमातेचे संरक्षण करते आहेत. त्यांनी संपूर्ण हिंदुस्थानामधील गोहत्या बंद केल्यामुळे त्यांना पोलादी पुरुष म्हणून संबोधले जाऊ लागले. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र भाई फडणीस यांनी गोमातेला राज मातेचा दर्जा दिला. गो शाळेला आर्थिक मदत दिली. सर्व गोशाळा चालकांच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांना अभिष्टचिंतन सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. आभार संस्थेचे सचिव शहाजी शिंदे यांनी मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *