करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यात दि. 15/9/25 रोजी पहाटे झालेल्या अतिवृष्टीमुळे संगोबा व पंचक्रोशीतील नागरिकांचे तसेच तालुक्यात इतरत्र ठिकाणी अतिवृष्टी मुळे कांदा, उडीद, मका, तूर, ऊस इ. पिकांचे जे नुकसान झाले आहे. त्यांची सरसकट नुकसान भरपाई शासनाने त्वरित द्यावी असे आवाहन कृ.उ.बा. समितीचे संचालक खरेदी विक्री संघाचे चेअरमन शंभूराजे जगताप यांनी प्रशासनाला केले आहे.

तसेच अतिवृष्टीमुळे सिनेकाठच्या गावातील लोकांच्या शेतात पुराचे पानी शिरल्यामुळे जमिनी वाहून गेल्या आहेत त्यांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आधार द्यावा. पुराच्या पाण्यामुळे अशी बिकट अवस्था निर्माण झाली आहे त्यामुळे ते लोकं बाहेर ही पडू शकत नाही अशा लोकांना शासनाने अन्न पुरवण्याची व्यवस्था करावी असेही आवाहन शंभूराजे यांनी केले आहे. माणुसकीच्या नात्याने प्रत्येकाने आपण सर्वांनी मिळून जे शक्य होईल ते सहकार्य या पूरग्रस्त बाधित शेकऱ्यांना करावे. मी ही जेवढी मदत होईल तेवढी मदत वेळोवेळी करत राहणार आहे.

वेळोवेळी प्रशासनाने अलर्ट राहून नदीकाठच्या गावातील लोकांना आर्थिक आधार देऊन अन्न पुरवण्याची व्यवस्था तात्काळ करावी अशाही सूचना शंभूराजे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच पोलीस प्रशासन संगोबा पूल येथे येऊन बॅरिगेट्स लावून जे उत्साही तरुण पाण्यातून वाट काढण्याचा प्रयत्न करतात किंवा पाण्यात शिरण्याचा प्रयत्न करतात त्यांना सूचना द्याव्यात जेणेकरून कुठलाही अनर्थ घडू नये.

तरी सिनेकाढच्या ग्रामस्थांना कुठलीही अडचण भासल्यास मला (शंभूराजे दादा जगताप) सपंर्क साधावा अशी विनंती त्यांनी केली आहे. सपंर्क – मोबाईल नं – 917058239394

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *