
करमाळा प्रतिनिधी
श्री छत्रपती संभाजी विद्यालय निंभोरेची विद्यार्थिनी संचिता बालाजी वळेकर हीने शालेय तालुकास्तरीय 200 मी़ रनिंग मध्ये दुसरा व लांब उडी मध्ये तालुक्यात तिसरा क्रमांक मिळविला त्याबद्दल आर.व्ही. ग्रुप तर्फे सरपंच रविदादा वळेकर यांचे हस्ते यशस्वी विद्यार्थिनी संचिता बालाजी वळेकर, मार्गदर्शक शिक्षक बेरे सर, मुख्याध्यापक व्यवहारे सर यांचा सन्मान करण्यात आला.

या यशाबद्दल ग्रामस्थांतून संचीताचे कौतुक होत आहे. सर्व स्तरातून यशस्वी विद्यार्थिनी, मार्गदर्शक शिक्षक व प्रशालेचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे. सरपंच रविदादा वळेकर यांनी देखील प्रत्यक्ष प्रशलेला भेट देऊन या सर्वांचा हार, फेटा, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी सरपंच रविदादा वळेकर, आर.व्ही. ग्रुप चे ईश्वर मस्के, नाथाभाऊ शिंदे, अक्षय वळेकर सर्व सहशिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व गावकरी उपस्थित होते.