
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यामध्ये अतिवृष्टीच्या पावसामुळे उडीद, कांदा, मका या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. सततच्या पावसामुळे व मुसळधार पावसामुळे करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. व्याजाने व उसनवारीने पैसे घेऊन बियाणे खरेदी केले होते. पेरणीचा खर्च, खुरापणी, खत, भरमसाठ खर्च झाला आणि एका दिवसामध्ये हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या कृपेमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. वडाचीवाडी येथे पावसामध्ये झाडाच्या आडोशाला बसलेल्या दोन शेतकरी महिलेवर वीज कोसळून एक महिला जागी ठार झाली व एक महिला दवाखान्यामध्ये शेवटच्या घटका

मोजत आहे. करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना आत्महत्या शिवाय पर्याय राहिलेला नाही. प्रशासनाने ताबडतोब सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अण्णासाहेब सुपनवर यांनी केली. कित्येक शेतकऱ्यांचे शेळ्या मेंढ्या जनावरे या पावसामुळे दगावले आहेत. भगवान देवराव वाघमोडे शेतकरी धायखिंडी, लता अण्णासाहेब सुपनवर यांचा कांदा, जानकुदास विष्णू खरात यांचा उडीद अशा अनेक शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले आहे.