केम प्रतिनिधी    

सांगोला येथे जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धा व तायक्वांदो जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धा या दोन्ही स्पर्धेमध्ये नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी उदयसिंह रामचंद्र फडतरे 17 वर्षे वयोगट व 51 किलो वजन गटात द्वितीय क्रमांक आला. 12/09/2025 उदयसिंह रामचंद्र फडतरे याचा द्वितीय क्रमांक आला.

करमाळा तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा 12/09/2025 ते 13/09/2025 रोजी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथे घेण्यात आल्या त्यामध्ये खालील विद्यार्थ्यांनी नंबर मिळवला.

19 वर्ष वयोगट 100 मीटर धावणे विनायक श्याम कळसाईत दुतीय क्रमांक, 19 वर्ष वयोगट 3000 मीटर धावणे शिवाजी बिभीषण बातखबर द्वितीय क्रमांक, 19 वर्ष वयोगट 3000 मीटर धावणे गणेश वसंत सावंत तृतीय क्रमांक, 19 वर्ष वयोगट 200 मीटर धावणे विनायक शाम कळसाईत द्वितीय क्रमांक, 19 वर्ष वयोगट 100 मीटर धावणे वृषाली महेश राजपुरे तृतीय क्रमांक, 14 वर्ष वयोगट गोळा फेक यश बाळू अवघडे द्वितीय क्रमांक, 19 वर्ष वयोगट थाळीफेक, सोहम दशरथ पारखे तृतीय क्रमांक, 19 वर्ष वयोगट गोळा फेक रवी बलभीम गाडे तृतीय क्रमांक, 19 वर्ष वयोगट हॅमर थ्रो गणेश वसंत सावंत प्रथम क्रमांक, 19 वर्ष वयोगट भालाफेक दिव्या अच्युत गुरव तृतीय क्रमांक मिळवला. या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव भाऊसाहेब बिचितकर तसेच संस्थेचे चेअरमन सुदर्शन बापू तळेकर, मुख्याध्यापिका ताकमोगे मॅडम, विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी या विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *