करमाळा प्रतिनिधी

शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग बांधव निराधार महिला यांचा बुलंद आवाज लोकनायक माजी राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये शेतकरी न्याय हक्कासाठी जाहीर सभा होणार आहे तरी आपण शेतकरी शेतमजूर बांधव, दिव्यांग बांधव, वंचित निराधार, महिला, मेंढपाळ, मच्छिमार, बेरोजगार तरुण, विटभट्टी संघटित असंघटित कामगार, कुंभारकाम, चांभारकाम, सुतारकाम, लोहारकाम करणारे छोटे मोठे व्यवसायीक, दुधउत्पादक शेतकरी, फळ उत्पादक, ऊस कापूस सोयाबिन उत्पादक शेतकरी यांच्या न्याय व हक्काच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करु असे म्हणणाऱ्या व शेतकयांच्या मालाला हमीभाव मिळावा या मागणीसाठी सरकारने दिलेला शब्द पूर्ण करावा. या सरकारला जागं करण्यासाठी शेतकरी न्यायहक्क मेळावा मंगळवार दिनांक 16/09/2025 रोजी सायंकाळी 6 वाजता केम ता.करमाळा येथे होणार आहे. तरी करमाळा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी उपस्थित रहावे जात, धर्म, पंत, पक्ष सोडा शेतकयांशी नाते जोडा.

प्रहार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बल्लूभाऊ जवंजाळ, सोलापूर जिल्हा निरीक्षक मंगेश ठाकरे, महेश बडे, प्रहार संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अमोल जगदाळे, सोलापूर जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील, सोलापूर शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील, जिल्हा समन्वयक पंडित साळुंखे, युवा जिल्हाध्यक्ष मोहसिन भाई तांबोळी, दीपक नाईकनवरे, शेअर कार्याध्यक्ष खालीद भाई मणियार, करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर, प्रहार संघटनेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी शेतकरी बांधव दिव्यांग बांधव यांनी आवाहान केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *