करमाळा प्रतिनिधी

युनिटी वेलनेस क्लब पुणे यांच्या वतीने पोथरे येथे बॉडी चेकअप कॅम्पचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजक बाळासाहेब होसिंग यांनी दिली. हे शिबिर रविवार दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले असून या शिबिराचा सर्व तालुकावासियांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे. या शिबिरामध्ये सुप्रीम कोच तानाजी कदम हे मार्गदर्शन करणार असून रोजची दिनचर्या कशी असावी, रोग प्रतिकार क्षमता कशी वाढवावी, दिवसभर उत्साही व एनर्जीटींक कसे राहावे, उंचीनुसार वजनाचे नियंत्रण कसे ठेवावे, आपला आहार कसा असावा, शरीरातील घटकांचे प्रमाण वजन कसे संतुलन ठेवावे, आहार विहार कसा असावा, ऋतुमान वयोमानुसार आपल्या शरीराची काळजी कशी घ्यावी, वयोमानुसार शरीरामध्ये होत जाणारे बदल, वजन, शरीरातील फॅट, व्हिसस्लुफॅट, शरीराचे वय, स्नायूंची स्थिती, पोटावरील फॅट, बी. एम. आय, मेटेबॉलिझम या सर्व गोष्टीवर अचूक मार्गदर्शन करणार आहेत. तरी आनंदी लॉन्स मंगल कार्यालय पोथरे येथे उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा असे अवाहन संयोजकांनी केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *