
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील सततच्या पडणार्या संततधार पावसामुळे त्याच प्रमाणे काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे आघाताची पिके मका उडीद कांदा सारखी वाया गेली आहेत. काही ठिकाणी केळीच्या बागेचे देखील अतोनात नुकसान झालं आहे त्यामुळे तालुक्यातील शेतकर्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हेराऊन घेतला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक व माणसिक दृष्टीने खचला आहे त्यामुळे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

मा.तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे-पाटील यांनी कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांची भेट घेतली असून त्या वेळी मी देखील मुळचा शेतकरी कुटूंबातील आसल्या मुळे शेतकरी अडचणी मी जाणतो. कोणत्या शेतकर्यां वरती अन्याय होणार नाही. लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासाठी आपण सकारात्मक आसल्याचे मंत्री दत्तात्रय भरणे यानी सांगितले अशी महिती मांढरे-पाटील यांनी दिली आहे.