करमाळा प्रतिनिधी

कमलाई देवी मंदिरातील उत्सव मुर्तीच्या दागिन्याची चोरी उघडकीस – २४००० रूपये किंमतीचे सोन्याचे मणीमंगळसुत्र जप्त केले आहे.

यात हकिकत अशी की,  दि २२/०८/२०२५ रोजी सायंकाळी ०५/०० वा ते दि. २३/०८/२०२५ रोजी पहाटे ०५/३० वा चे दरम्यान फिर्यादी नामे रोहीत महादेव पुजारी, वय २२ वर्षे व्यवसाय पुजारी, रा. देवीचा माळ, करमाळा ता. करमाळा जि. सोलापूर यांनी मौजे देवीचा माळ येथील कमलाभवानीच्या मंदिरातून कमलाभवानी उत्सव मुर्तीचे गळयातील २४,०००/-रु किंमतीचे दोन वाटया असलेले व त्याला चार मणी असलेले सोन्याचे अंदाजे २.४ ग्रॅम वजनाचे मनी मंगळसुत्र हे कोणीतरी अज्ञात चोरट्याने मुददाम लबाडीने चोरुन नेले बाबत करमाळा पोलीस ठाणेस गुरनं. ६९५/२०२५ बी एन एस कलम ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.

करमाळा पोलीस ठाणे, सोलापुर ग्रामीण मागील काही महिन्यापासून चोरीचे गुन्हे वारंवार घडत असल्याने पोलीस अधीक्षक, अतुल कुलकर्णी (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक, प्रिमत यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही. एस. (भा.पो.से.), करमाळा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक, रणजीत माने यांनी अशा प्रकारचे चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेकामी आदेशीत केले होते त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांचे मार्गर्शनाने पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरनण शाखेच्या अंमलदारांना सदरचा गुन्हा उघडकीस आणणेकामी सुचना दिल्या होत्या.

त्याप्रमाणे करमाळा पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथक सदरचे गुन्हे उघडकीस आणणेकामी मागावर असताना गोपनीय बातमीदार, सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणा आधारे सदरचा गुन्हा हा आरोपी नामे सागर बाळू राउत, वय ३१ वर्षे, रा. कुंकुगल्ली, करमाळा, ता करमाळा, जि सोलापुर याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सदर आरोपी शोध कामी करमाळा पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथक रवाना झाले, गोपनिय बातमीदारामार्फत सदर आरोपी हा करमाळा शहरात असलेबाबत माहीती मिळाली असता सदर माहीतीच्या अनुषंघाने बातमीतील नमुद ठिकाणी पथक गेले असता आरोपी मिळून आल्याने त्यास पकडून त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सदर सोन्याच्या दागिन्याची चोरी केल्याची कबूली दिल्याने त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आले. आरोपी मजकूर याचे ताब्यातून २४,०००/- रूपये किंमतीचे वरील वर्णनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहेकों / १६८५ ऐ.एस. मोहोळकर हे करत आहेत.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *