करमाळा प्रतिनिधी

दिं. 26 रोजी सकाळी साडेदहा वाजता पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांची रामटेक या सरकारी निवासस्थानी भेट घेऊन करमाळा तालुक्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या शिफारशीवरून मौजे कंदर तालुका करमाळा या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 याबाबत मामांचे खंदे समर्थक अण्णासाहेब पवार यांनी भेट घेऊन पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करणेबाबत निवेदन दिले असता पंकजाताई मुंडे यांनी तात्काळ पशुसंवर्धन उपआयुक्त सोलापूर यांना सूचना देऊन प्रस्ताव तात्काळ सादर करणेबाबत आदेशित केले व लवकरच सदर पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करणेबाबत सचिवांना आदेश करण्याचे सुचित केले. पंकजाताई मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री असताना देखील पाटील वस्ती ते सातोली रस्त्यासाठी 56 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला होता.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *