
प्रतिनिधी करमाळा
सर्वोदय प्रतिष्ठा यांच्या वतीने गणेशोत्सव निमित्ताने बौद्धिक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर व्याख्यान माला शुक्रवार दि. 29 ऑगस्ट 2025 रोजी पासून रविवार दि. 31 ऑगस्ट 2025 पर्यंत चालणार आहे. या व्याख्यानमालेत पहिल्या दिवशी माईंड पॅावर ट्रेनर डॉ.दत्ता कोहिनकर यांचे व्याख्यान होणार असून त्यांचा विषय -“मनाची अमर्याद शक्ती व तणाव मुक्ती” असा आहे तसेच दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध कवी व व्याख्याते प्रा. संदीप जगताप यांचे व्याख्यान होणार आहे. हे -“कविता आणि बरच काही” या विषयावर बोलणार आहेत तसेच तिसऱ्या दिवशी प्रसिद्ध वक्ते डाँ.संजय कळमकर यांचे -“जगण्यातील आनंदाच्या वाटा” या विषयावर व्याख्यान होणार आहे. तरी या व्याख्यानमालेचा लाभ करमाळा तालुक्यातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन सर्वोदय प्रतिष्ठान वतीने करण्यात आले आहे. व्याख्यानमाला ही विजयश्री सभागृह यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे दररोज सायंकाळी सहा वाजता संपन्न होणार आहे. या व्याख्यानमालेसाठी सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक चव्हाण यांनी केले आहे.
