सोलापूर प्रतिनिधी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त उज्ज्वलकुमार माने यांनी संपादित केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी या विशेषांकाचे प्रकाशन तिरुवनंतपुरम्‌‍ येथे केरळचे महामहीम राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते राजभवनात करण्यात आले.

अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्याविषयी समग्र माहिती असणारे इतिहास संशोधक व अभ्यासक यांचे लेख या विशेषांकात आहेत. अहिल्यादेवींच्या जीवनकार्याची माहिती उज्ज्वलकुमार माने यांनी दिली. या कार्यक्रमाला सोलापूर येथील अश्विनी सहकारी रुग्णालयाचे संचालक अशोक लांबतुरे, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या माजी सदस्या सुरेखाताई लांबतुरे, सामाजिक कार्यकर्ते मधुकर गवळी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *