
करमाळा प्रतिनिधी
दिनांक 15/08/2025 रोजी भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन ढोकरी ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोकरी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यानिमित्त ढोकरी गावचे सुपुत्र, ढोकरी गावच्या इतिहासातील पहिले डॉक्टर विशाल दत्तात्रय पाटील (ढोकरी) याची डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेज नगर येथे M.B.B.S. स्कोर्ससाठी निवड झाल्याबद्दल ढोकरी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
