
करमाळा प्रतिनिधी
श्री संत ज्ञानेश्वर माऊली गोशाळेमध्ये करमाळा माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती राजमाता ग्रुप जय मल्हार उद्योग समूहाचे अध्यक्ष पैलवान एकनाथ महाराज सुपनवर यांनी दिली आहे.

दि. 21 वार गुरुवार या दिवशी गो शाळेमध्ये वृक्षारोपण राजमाता गोमातेचे पूजन जिल्हा प्राथमिक शाळा अयोध्या नगर सुपनवर वस्ती येथे शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊवाटप करण्यात येणार आहे. आ. पाटील यांनी करमाळा तालुक्यात विकासाची गंगा आणली आहे, रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेचे काम सुरू झाले आहे, जातेगाव ते टेंभुर्णी रस्त्याच्या काम प्रगतीपथावर आहे, दहिगाव उपसा सिंचनचे पाणी वडशिवणे तलावामध्ये सोडले आहे, आळसुंदे सालसे नेरले वरकुटे या गावांना सुद्धा पाणी सोडलेले आहे, म्हशेवाडी तलावामध्ये सुद्धा दहिगाव उपसा सिंचनचे पाणी आ. पाटील यांच्यामुळे मिळाले कुकडी कालव्यामधून मांगी तलाव व वीट परिसरामध्ये पाणी सोडले. आ. पाटील यांच्यामुळे करमाळा तालुक्यात विकासाची कामे चालू झालेले आहेत म्हणून अशा या नेत्याच्या वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.