करमाळा प्रतिनिधी

दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये सकाळी 8:15 वाजता भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे विश्वस्त प्रा. चंद्रशेखर शीलवंत सर,  माजी प्राचार्य डॉ. विजयराव बिले, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अनिल साळुंखे व कॅ. संभाजी किर्दाक, राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रमुख कॅ. विजया गायकवाड, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. राम काळे हे ही उपस्थित होते.

महाविद्यालयामधील राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांनी विविध शिबिरांमध्ये मिळविलेल्या प्राविण्याबद्दल प्रमाणपत्र व पदके देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच एन. सी. सी. व एन. एस. एस. चे स्वयंसेवक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मुन्नेश जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन जाधव मॅडम यांनी केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *