
करमाळा प्रतिनिधी
आज दि. 12/8/2025 रोजी तहसीलदार करमाळा यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. सदर निवेदनाच्या प्रति नगर पालिका मुख्याधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांनाही देण्यात आल्या.
करमाळा नगर परिषदेवर अनेक वर्ष झाले प्रशासक नियुक्त आहे. गत 5 वर्षा पासुन करमाळा शहरातील नागरिकांना नागरी सुविधा उपलब्ध होत नाही. यामध्ये अनियमित आणि गाळ मिश्रित होणारा पाणीपुरवठा तो ही 4-5 दिवसातून एकदा, शहरातील अनेक भागात तुंबलेल्या गटारी व त्यामुळे होणारी दुर्गंधी, अपुरा असणारा कर्मचारी वर्ग, शहरातील निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे डांबरीकरण या सर्व गोष्टीमुळे शहरात वास्तव्य करणारी सर्व- सामान्य जनता खूप त्रासलेली आहे. यापूर्वी अनेक संघटनांनी या विषयी निवेदन देऊन सुद्धा मुख्याधिकारी यांना खडबडून का जाग येत नाही असा प्रश्न सामान्य जनतेला पडत आहे.एखादी सर्वसामान्य महिला जरी साधी तक्रार करायला गेली तरी उडावा उडवीची उत्तर अधिकारी वर्गा कडून दिली जातात.संपूर्ण करमाळा शहरात भटक्या कुत्र्यानी धुमाकूळ घातला असून जेष्ठ नागरिक तसेच शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी यांना चालत जाणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागत आहे. शहरातील वेगवेगळ्या विभागामध्ये अनेक जणांचा चावा कुत्र्यांनी घेतला आहे. शहरातील अनेक भागात रस्त्यावर कचऱ्याचे ढीग पहायला मिळतात. अनेक गल्ली बोळातले पेव्हिंग ब्लॉक उचकटून पडलेले आहेत. शहरातील मोकाट जनावरे नगर परिषदे मार्फत कोंडावडा येथे स्थलांतरित करूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यात उपाशीपोटी काही जनावरे मृत झाली आहेत. काही जनावरे लंम्पी आजाराने त्रस्त आहेत. अशा बाधित जनावरांचे लसीकरण होत नाही. अस्वच्छता असल्यामुळे डेंगू, मलेरिया, उलटी, जुलाब, रोग पसरत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ भाजी मंडई रहदारी भाजी विक्रेते पत्रा शेड पाईप (खांब) पूर्ण तुटले अवस्थेत आहे. पावसाळा दिवस चालू आहे. अश्या दिवसात वारा वादळ मोठ्या प्रमाणात झाले तर मोठी जिवितहानी होऊ शकते. या घटनेला जबाबदार कोण हे प्रकरण निदर्शनास आणून दिले पण जैसे थे परिस्थिती अश्या एक नाही अनेक समस्या शहरातील विविध भागात प्रामुख्याने भेडसावत आहेत. वरील सर्व गोष्टीवर त्वरित उपाययोजना केल्या नाहीत तर शुक्रवार दिनांक 22/8/2025 रोजी शुक्रवारी नगर परिषदे समोर युवक काँग्रेसचे सर्वाना सोबत घेऊन बेमुदत साखळी उपोषण करणार असे निवेदनात दिले आहे. यावेळी निवेदनावर obc सेल काँग्रेस तालुकाध्यक्ष. गफुर भाई शेख, चंद्रकांत साळवे, शिवाजी आवटे, प्रतीक जगताप, भीम आर्मी तालुकाध्यक्ष विशाल जाधव, अंतरिक्ष जाधव, रोडे महाराज, आनंद पोळ यांच्या स्वाक्षरी आहेत.