
करमाळा प्रतिनिधी
मौजे बोरगाव ता.करमाळा या ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच (सॅाफ्टवेअर इंजिनियर) हर्षालीताई विनय ननवरे यांच्या सरपंच पदाच्या वर्षपूर्ती निमित्त बोरगाव ग्रामपंचायतच्या वतीने मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील कुटूंबाना पिण्याच्या पाण्याचा जार व कचरा पेटी (डस्टबिन) चे मोफत वाटप करण्यात आले व तसेच गावातील शासकीय व निमशासकीय सेवेतून सेवा निवृत्त झालेल्या प्रतिष्ठीत व्यक्तीचा व सेवा निवृत्त झालेल्या नागरिकांचा ग्रामपंचायतच्या वतीने सन्मान करुन भेटवस्तू देण्यात आली.

तसेच गावातील गुणवंत विध्यार्थ्याचा ट्रॉपी देऊन सन्मान केला. हा क्रार्यक्रम करमाळा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक रणजीत माने व सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित शिंदे,राष्ट्रवादी कोंग्रेस पार्टीचे जिल्हाउपाध्यक्ष आशपाक जमादार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, आजी-माजी पदाधिकारी, प्रतिष्ठित व्यक्ति यासह ग्रामस्थ मोठया संख्येंने उपस्थित होते.

