
माढा करमाळा
माढा तालुक्यातील उपळवाटे येथे महसूल सप्ताह निमित्त अतुल खूपसे पाटील प्रमुख जनशक्ती शेतकरी संघटना यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यानिमित्ताने प्रत्येक वर्षी कमीत कमी 100 झाडे लावण्याचा मानस गावातील तरुणांनी केला आणि ती झाडे प्रत्येक तरुणांनी दत्तक घेण्याचं ठरवून ते झाडे मोठी करण्याचं काम तरुणांनी करण्याची शपथ देण्यात आली. एका बाजूने वृक्षतोड होत असताना उपळवाटे गावातील जनशक्ती शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तरुण पिढी वृक्षारोपण

करण्यासाठी महसूल सप्ताहाच्या निमित्ताने पुढे येत आहे हे कौतुकास्पद आहे आणि प्रत्येक तरुणाने आपला वाढदिवस असेल लग्नाचे किंवा वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम असतील यावेळी प्रत्येकाने कमीत कमी एक तरी वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी घ्यावी असे अतुल खूपसे पाटील यांनी मनोगत व्यक्त केले

कार्यक्रमासाठी महसूल ग्रामविकास अधिकारी अमोल झाडे, ग्रामपंचायत शिपाई तानाजी गायकवाड, महसूल प्रतिनिधी बारवे तसेच अक्षय देवडकर, शरद सपाटे, लक्ष्मण जाधव, विजय खूपसे, अमोल जाधव, बालाजी गरड, अमीन मुलानी, पप्पू दाजी चव्हाण आणि गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
