संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळाचा व पर्यटन विभागाच्या आई कर्ज योजनेच्या व्याज परताव्याचा लाभ सोलापुरातील सर्व सलून व्यावसायिकांनी व नाभिक बांधवांनी घ्यावा व आर्थिक सक्षम व्हावेत :- आमदार सुभाष बापू देशमुख

करमाळा प्रतिनिधी

लोकमंगल बँक व नाभिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित कर्ज विषयक मार्गदर्शन शिबिर तथा उद्योजक मेळावा निर्मलकुमार फडकुले सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष तथा आमदार सुभाष बापू देशमुख यांनी सोलापूर शहरातील नाभिक समाजातील सलून व्यावसायिकांनी संत सेनाजी महाराज केश शिल्पी महामंडळ (व्याज परतावा) कर्ज योजनेचा व आई पर्यटन कर्ज योजनेच्या वैयक्तिक लाभाच्या व्याज परताव्याचा लाभ जास्तीत जास्त नाभिक समाजातील सलून व्यावसायिकाने घ्यावा व आपला व्यवसाय वाढवून आर्थिक सक्षम व्हावे याकरिता लोकमंगल बँक सर्वोपत्तरी सहकार्य व मदत करेल असे मत बँकेचे अध्यक्ष आमदार सुभाष बापू देशमुख यांनी व्यक्त केले. यावेळी सोलापूर

शहरातील सलून व्यावसायिक व नाभिक बांधवांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी महामंडळाच्या सोलापूर जिल्हा व्यवस्थापिका वृषाली लहारे यांनी महामंडळाची सविस्तर माहिती उपस्थित सलून व्यवसायिकांना दिली व याचा जास्तीतजास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी व्यासपीठावर नाभिक समाजाचे जेष्ठ नेते पांडुरंग चौधरी, हिंदुराव गोरे, दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अभयकुमार कांती, प्रभाकर भालेकर, राष्ट्रीय नाभिक संघटनेचे प्रदेश युवक अध्यक्ष सुधीर भाऊ गाडेकर, सकल नाभिक समाज समन्वयक किरण भांगे यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर कार्यक्रमास नाभिक समाजातील विविध दुकानदार संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्यासह सलून व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *