
करमाळा प्रतिनिधी
करमाळा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पहाट कार्यक्रमाचे अनुषंगाने जिंती बीट मधील भगतवाडी या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आम्ही स्वतः तसेच बीट अधिकारी PSI संदीप बनकर, अमलदार व पंचायत समिती करमाळा येथील स्टाफ, समाज कल्याण विभागाचे स्टाफ, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील यांचे उपस्थितीत पारधी समाजाच्या लोकांची बैठक घेण्यात आली.

सदर बैठकीसाठी 50 ते 60 पारधी समाजाचे पुरुष स्त्री मुले हजर होती. त्यांना आम्ही गुन्हेगारी पासून परावृत्त होऊन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी चोऱ्या, अवैध दारू विक्री करू नये असे सांगून शासनाकडून मिळणाऱ्या योजनांचे मार्गदर्शन केले आहे.

पंचायत समिती करमाळा येथील दिनेश काळे वरिष्ठ सहाय्यक पंचायत समिती यांनी त्यांना शबरी आवास योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या योजना समजावून सांगून त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड, आधार कार्ड, अपंगाचा दाखला, रहिवासी दाखला, डोमीसाईल सर्टिफिकेट,जागेचा उतारा, इत्यादी बाबत माहिती देऊन ती कागदपत्रे कशी काढायची याबाबत मार्गदर्शन केले आहे.

समाज कल्याण विभाग गोरख खंडागळे कनिष्ठ सहाय्यक यांनी पारधी समाजासाठी असणाऱ्या सात योजना त्यामध्ये मागासवर्गीय शेळीपालन, शिलाई मशीन, झेरॉक्स मशीन, अपंगासाठी शेळीपालन, पिठाची गिरणी, अपंगासाठी असणारी स्कुटी, इत्यादी बाबत मार्गदर्शन करून त्यासाठी मिळणारे अनुदानाबाबत व कागदपत्र बाबत माहिती दिली.
केंद्रप्रमुख गोरे व अंगणवाडी सेविका उर्मिला गुंजाळ यांनी पारधी समाजाचे मुलांना शिक्षणापासून वंचित न ठेवता त्यांना शिक्षण घेणेबाबत सांगून शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले तसेच शिक्षणासाठी शासनाकडून मिळणारे योजनांची माहिती दिली आहे.