
करमाळा प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या करमाळा तालूका अध्यक्ष पदी प्रसाद कालिदास जगताप (उद्योग व व्यापार विभाग) निवड करण्यात आली आहे.
ही निवड जिल्हाध्यक्ष गोरख पाटील यांनी पत्र देऊन ही निवड केली आहे.

पत्रात असे लिहिले आहे की, आपणास या पत्राद्वारे कळविण्यात येते की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या करमाळा तालूका अध्यक्ष पदी (उद्योग व व्यापार विभाग) निवड करण्यात येत आहे. आपण पक्षाचा व संघटनेचा अधिक विस्तार करून दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडाल. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांचे विचार व सुभाष मालपाणी व मा. आ. संजयमामा शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच पक्षाचे ध्येय धोरणे समाजात तळागाळात पोहचविण्याचे यशस्वी प्रयत्न कराल, असा विश्वास व्यक्त करतो.

