
करमाळा प्रतिनिधी
ग्राम विकासासाठी वेगवेगळे उपक्रम राबवणाऱ्या भोसरे गावच्या कर्तव्यदक्ष माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुलन रामदास बागल यांनी 2017 ते 2025 मध्ये विविध लोकोपयोगी कामे, शालेय विद्यार्थ्यांना सायकली वाटप, इतर विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याबद्दल अखिल भारतीय सरपंच परिषदेचा मानाचा सन्मानाचा राज्यस्तरीय ग्रामरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार आपल्याला संधी देणाऱ्या भोसरे गावच्या

स्वाभिमानी जनतेला व सर्व सहकाऱ्यांना समर्पित करण्यात आला आहे. तसेच आपल्या कामाची दखल घेऊन अखिल भारतीय सरपंच परिषदेने आणखी काम करण्याची ऊर्जा निर्माण केल्याबद्दल त्यांचेही मनःपूर्वक धन्यवाद करण्यात आले आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

यावेळी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन यशदाचे माजी महासंचालक माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील, प्रसिद्धीप्रमुख विनायक पाटील, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
