करमाळा प्रतिनिधी

दलित महासंघ करमाळाच्या वतीने साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त उपजिल्हा रुग्णालयात केळी वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. गुंजकर व डॉ. अभंग तसेच कर्मचारी वृंद उपस्थित होते. ॲडमिट पेशंटला व दवाखान्यामध्ये आलेले सर्व लोकांना केळी वाटप केली व डॉ. गुंजकर यांना फकीरा ही अण्णाभाऊंची लाडकी कादंबरी सप्रेम भेट दिली. यावेळी दलित महासंघाचे तालुका अध्यक्ष दीपक आरणे यांनी मनोगत व्यक्त केले. आभार शहराध्यक्ष बापूराव जाधव यांनी मानले.

यावेळी अन्याय अत्याचार निवारण संघाचे संपादक अमित आलाट, तालुका संघटक प्रदीप आलाट, शहाजी धेंडे, ज्ञानदेव आलाट, तानाजी लोंढे, नामदेव पोळ, आयुष आलाट, मुंबई हायकोर्टचे एडवोकेट सुनिता आलाट, इ. उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *