
करमाळा प्रतिनिधी
स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल मध्ये अतिशय उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली होती. सर्वप्रथम महिला पालकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सरस्वती पूजन करण्यात आले. आई हा आपला पहिला गुरु मानून प्रथम मुलांनी त्यांचे पूजन केले. नंतर मुलांनी शिक्षकांना गुलाब देऊन त्यांचा सन्मान केला. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रम्ह तस्मै

श्री गुरुवे नमः हा श्लोक सर्व विद्यार्थी व शिक्षक, पालक यांनी म्हणला. या नंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन पुणे येथील जित मेहता, श्री रामचंद्र बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्थेचे मार्गदर्शक संचालक प्रमोद दळवी, अध्यक्ष जयंत दळवी, मुख्याध्यापिका धनश्री दळवी यांनी केले. तर या कार्यक्रमासाठी सहशिक्षिका शिवांगी कांबळे,

शुभांगी खळदकर, रोहिणी गरड, अमृता पाटील,पूनम परदेशी, कल्याणी परदेशी, सुनंदा दुधे, सविता पवार, अश्विनी झाडबुके, कृष्णा पवार, असिफ मणेरी यांनी परिश्रम घेतले होते. यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
