करमाळा प्रतिनिधी

अखेर तक्रारीची दखल घेत करमाळा नगरपालिका शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे यांचा काढला चार्ज मांढरे- पाटील यांनी केली होती शिक्षण मंत्र्यांकडे तक्रार

करमाळा नगरपालिका शिक्षण विभाग प्रमुख प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करून कारवाई करण्यात यावी तसेच संबंधित अधिकारी गेल्या सहा ते सात वर्षा पासून गुळाला मुंगळा चिकटल्या सारखं प्रभारी म्हणून क.न.मध्ये कोणत्या नियमा नुसार व कोणाच्या आशीर्वादाने यांची चौकशी करावी. त्याच प्रमाणे संबंधित अधिकारी यांनी करमाळा नगरपालिका व बार्शी नगरपालिका चार्ज घेतल्या पासून आपल्या अधिकाराचा गैरवापर करून शिक्षक बदली पासून ते अनेक बेकायदेशीर शासन नियम डावलून नियम बाह्य कामे केली असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे मा.तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे-पाटील यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे व शिक्षण उप संचालक पुणे यांच्या कडे केली आहे. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आयुक्त माध्यमातून शिक्षण उप संचालक यांना चौकशी अधिकारी नेमून अहवाल मागणी केली आहे त्यामुळे बार्शी व करमाळा नगरपालिका शिक्षण विभागातील संबंधित अधिकारी यांनी केलेल्या कारभाराची चौकशी होणार आसल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे-पाटील यांनी दिली आहे.

….

मी माझ्या काळात पारदर्शक कारभार केला आहे. कुठल्याही शिक्षक कर्मचाऱ्यांची अडवणूक केली नाही मांढरे पाटील यांचा माझा एकदाच संपर्क आला होता त्यांचे काम वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे होते – अनिल बनसोडे (शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी,करमाळा)

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *