करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील उजनी जलाशयावरील गोयेगाव तालुका करमाळा ते आजोती तालुका इंदापूर या पुलाच्या कामाचा सर्वे करण्याचे काम तातडीने हाती घेण्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले असल्याची माहिती मकाई कारखान्याचे माजी चेअरमन व शिवसेना जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांनी आज येथे दिली. याबाबत अधिक माहिती देताना बागल म्हणाले की, करमाळा तालुक्यातील गोयेगाव ते आजोती हा पूल वाहतुकीच्या व

दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने व गेल्या वर्षी कुगाव येथील बोट दुर्घटनेमुळे नागरिकांना करमाळा तालुक्यातून पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे विविध कामांच्या निमित्ताने जावे लागते बोटीतून होणारा प्रवास अतिशय जीवघेणा व धोकादायक असल्याने गोयेगाव ते आजोती हा पूल होणे अत्यंत गरजेचे होते. परिसरातील नागरिकांची तशी मागणी होती. त्याप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री नेते एकनाथ शिंदे यांनी या मागणीचा गांभीर्याने विचार करून गोयेगाव ते आजोती हा पूल

तातडीने होणे बाबत सर्वे करण्याचे आदेश मंत्रालयीन पातळीवरून दिले आहेत. त्यामुळे आता या पुलाच्या सर्वे करण्याचे काम तातडीने सुरू होईल व हा पूल झाल्यानंतर करमाळा तालुक्यातून पश्चिम भागातून पुणे जिल्ह्याला होणारी वाहतूक सुरळीत होईल असा विश्वास दिग्विजय बागल यांनी यावेळी व्यक्त केला.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *