करमाळा प्रतिनिधी

नवी दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या व संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांची कन्या रेवती व सारंग यांच्या स्वागत समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. या मंगलमय सोहळ्यास करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण (आबा) गोविंदराव पाटील यांनी उपस्थित राहून नवदाम्पत्य रेवती व सारंग यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी देशाच्या राजकारणातील अनेक मान्यवर नेत्यांची उपस्थिती लाभली. राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार,केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, खासदार निलेश लंके यांच्यासह विविध पक्षांतील वरिष्ठ नेते, पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

या प्रतिष्ठित सोहळ्याच्या निमित्ताने देशाच्या राजकारणातील विविध विचारधारांच्या मान्यवरांशी आमदार नारायण (आबा) पाटील यांची भेट व संवाद साधला गेला.

रेवती व सारंग यांच्या भावी वैवाहिक जीवनासाठी प्रेम, आनंद, सुख-समृद्धी आणि यश लाभो अशा मनःपूर्वक शुभेच्छा यावेळी आ.नारायण(आबा) पाटील यांनी दिल्या.

नवी दिल्लीतील या शानदार स्वागत समारोहामुळे राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक स्नेहबंधांचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळाला.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *