करमाळा प्रतिनिधी

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत असणाऱ्या कृषी विज्ञान केंद्र मोहोळ, कृषी विभाग करमाळा, कृषी संशोधन केंद्र जेऊर, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर व भरड धान्य संशोधन केंद्र सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने शास्त्रज्ञांनी भेट दिली. या कार्यक्रमादरम्यान कृषी विज्ञान केंद्र मोहोळ येथील विषय विशेषज्ञ डॉ.स्वाती कदम यांनी ऊस पाचट व्यवस्थापन,  तूरीचा शेंडा खुडणे व बीबीएफ तंत्रज्ञानाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले

तसेच राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्र सोलापूर येथील डॉ.पिंकी रायगोंड मॅडम यांनी डाळिंब पिकातील मर रोग व्यवस्थापन व डॉ. बसवराज यांनी केळी पिकातील विषाणू रोगाचे व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. विशाल वैरागर यांनी जलतारा योजने चा लाभ घेण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.तानाजी वाळकुंडे यांनी केले. या कार्यक्रमात विशेष आकर्षण असणारा विकसित कृषी भारत संकल्प रथ फिरविण्यात आला व विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली. तुषार अहिरे यांनी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याविषयी माहिती सांगितली.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक अजयकुमार बागल, जेऊर मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाचे सहाय्यक कृषी अधिकारी गायकवाड मॅडम, शेलार मॅडम, राहुल गव्हाणे, उप कृषी अधिकारी प्रताप तळेकर व कांतीलाल कोकणी, कृषी संशोधन केंद्र जेऊर येथील कृषी सहाय्यक लोखंडे व बिडगर तसेच समस्त कृषी संशोधन केंद्रातील कर्मचारी तसेच कृषी विभागातील कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमास शेलगाव (वांगी) गावचे सरपंच अमरदादा ठोंबरे, ग्रामपंचायत सदस्य भारत पोटे, पोलिस पाटील केकान व इतर प्रतशील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *