करमाळा प्रतिनिधी

दिं. 7 मे रोजी बकरीद ईद (ईद उल अजहा) ची नमाजपठण करमाळा शहरातील मौलाली माळ येथील ईदगाह मैदानावर ठीक सकाळी 08:00 वाजता होईल अशी माहिती करमाळा शहरातील शहर काझी हाजी कलीम काझी सर यांनी सांगितले असुन शहर व तालुक्यातील समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.

तसेच समाज बांधवांनी ईद ची नमाजपठण झाल्यानंतर शांतता मय वातावरणात कुर्बानी करावी व कुर्बानी केल्यानंतर कोणतेही चित्र किंवा व्हिडिओ चित्रीकरण न करता सोशल मीडिया वर प्रसारित करु नये. तसेच कुर्बानी केल्यानंतर परिसरात घाण न करता आपला परिसर स्वच्छ ठेवा व शासनाने दिलेल्या अटी व शर्ती चे नियम पाळुन प्रशासनास सहकार्य करावे व मोठ्या भक्तिभावाने ईद चा सण साजरा करावा असे आवाहन सर्व मुस्लीम समाज बांधवांना केले आहे.

यावेळी ईमित्याज पठाण, मुस्तकीम पठाण, जमीर  सय्यद, रमजान  बेग, सुरज शेख, अॅड. नईम काझी, समीर शेख, समीर बागवान, जहांगीर बेग, इकबाल शेख,  फिरोज बेग, आलिम खान, अरबाज बेग, शाहीद बेग कलीम शेख, अलीम शेख, सोहेल पठाण, अमीर शेख, सुपरान शेख, अय्युब शेख, इन्नुस मुजावर उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *