करमाळा प्रतिनिधी

श्रीकमलादेवी मंदिराचे पुरातन दगडी स्वरूपातील असलेले मुळ मंदिराचे दर्शन भाविक भक्तांना मिळणार आहे.

श्रीजगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्टच्या संयोजकाने श्रीकमलादेवी मंदिर जतन व संवर्धन कामास गेल्या वर्षापासून सुरुवात करण्यात आलेली आहे. मंदिर जतन  संवर्धनाचे काम  प्रगतीपथावर असून भक्तांच्या देणगी रूपी सहकार्यातून या कामास सुरुवात करण्यात आलेली आहे. आज शुक्रवार दिनांक १६/०५/२०२५ रोजी बाबासाहेब दिगंबर यादव रा. करमाळा यांचे कडून रोख देणगी रु. १११११/- (आकरा हजार एकशे अकरा फक्त) रोख देणगी मंदीर जतन संवर्धन कामास देणगी प्राप्त झाली आहे.

मंदिर समिती तर्फे या निमित्त श्रीकमला देवी मंदिर समिती कडून सुशिल राठोड विश्वस्त, अशोक गाठे व्यवस्थापक,  ज्योतीराम (नाना) लावंड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी यादव परिवार, पुजारी, भक्तगण, मानकरी, सेवेकरी, श्रीदेवीचा माळ ग्रामस्थ उपस्थित होते.

श्रीकमलादेवी मंदिर जतन संवर्धन काम प्रगती पथावर असल्याकारणाने भाविकांनी सढळ हाताने देणगी देऊन या कामात सहकार्य करण्याचे आव्हान देखील श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्ट कडून करण्यात आले आहे.

तसेच ऑनलाईन देणगी ची सुविधा उपलब्ध आहे. संपर्क अशोक गाठे व्यवस्थापक मो.नं. ९४०४७०८९२४, ९५७९९६१७७४

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *